'गुरु परमात्मा परेशु' अशा शब्दांत गुरूंची महती सांगितली जाते. गुरू हेच ब्रह्मा, गुरू हेच विष्णू, गुरू हेच महेश्वर, गुरू हेच माध्यम असते ईश्वरापर्यंत पोहोचण्याचे. परमात्म्याची वाट गुरूच्या चरणकमलांतून सुर होते. पण गुरू म्हणजे कोण?असं म्हटलं जातं की, जी व्यक्ति आपल्याला चांगलं काही शिकवते तिला गुरू म्हणावं. हे जरी खरं असल तरी गुरुंना एवढ्या मयादित शब्दांत बसवता येत नाही. गुरूदेव सांगतात, आत्मा हाच गुरू, कारण आत्मा हे परमात्म्यांपर्यंत पोहचण्याचं सर्वात महत्वाचं माध्यम आहे. एकदा भगवान शंकर आणि पार्वती कैलासावर क्रीडा करत होते. पार्वतीने शंकराला विचारले, तुम्ही कायम समाधिस्त असता, तुम्हीच या विश्वाचे जन्मदाते, पालक आणि संहारक असतात. मग तुम्ही ध्यान तरी कोणाचे करता? त्यावर शंकर उत्तरले. 'आत्म्याचे' देवी जग आत्मतत्वाचाच विस्तार आहे. मी सदा सर्वदा त्याचेच ध्यान करीत असतो. आत्मतत्वालाच वेदांती ब्रह्म म्हणतात. तर शैव परमशिव, पार्वतीपती शंकर हा निर्गुण परमशिवाचे सगुण रूप आहे. त्याचे हे सगुण रूप त्याने परमशिव तत्वाच्या आराधनेच साकारलेली आहे. तेव्हा सोप्या भाषेत सांगायचे र भगवान शंकर स्वत:चेच ध्यान करतात. अध्यात्म स्वत:चे म्हणजे आत्म्याचे. पुढे पार्वतीने शंकराला विचारले, 'मलाही हे रहस्या काय आहे, त्याचे ज्ञान द्याल का?' त्यावर शंकर म्हणाले, 'जरूर, पण देवी हे ज्ञान अती गूढ आहे. तेव्हा एकांतातच मी तुला हे प्रदान करीन.' यावर हे दोघे एकांत कुठे मिळेल ते पाहू लागले. नंदी, रुद्रगण यांना चुकवून त्यांनी एका नदीचा काठ पसंत केला. काठावर बसून शंकर पार्वतीला कुंडलिनी योगशाधींचे गूढ ज्ञान प्रदान करू लागले. ज्ञानाचे कार्य संपल्यावर पार्वतीला किती कळले हे पहावे, असा विचार शंकरांच्या मनात आला. त्यांनी विचारले, 'देवी, तुला सर्व नीट कळले ना! सांग बरे सर्वत्र काय भरलेले आहे? या प्रश्नावर पार्वती उत्तर देणार एवढ्यात पाण्यातून उत्तर आले. भगवंतांनी आश्चर्यचकीत होवुन पाहिले तर माशाच्या पोटातील गर्भाने ते उत्तर दिले होते. तोच पुढे मच्छिंद्रनाथ झाला. आदिगुरू शंकरापासून उगम पावलेले गुरुतत्व प्रत्येक गुरूत वास करत असते. गुरू हे एक तत्व आहे. हाडामांसाचा देह नव्हे. गुरूविषयी दोन टोकाच्या भूमिका घेणारे विचारप्रवाह आज आढळतात. काही म्हणतात, आम्हाला गुरूची गरज नाही, तर काही म्हणतात, गुरू म्हणजे कोण, एक मनुष्य देह, या दोघांनही खरे गुरूतत्व कळलेच नाही, असे म्हणावे लागेल. अध्यात्ममार्गावर गुरूचे महत्व वादातीत आहे. गुरू या शब्दाचा अर्थ आहे अज्ञानरूपी अंधकार दूर करणारा. हे कार्य ज्यामुळे साधेल तो गुरू. जीव आणि शिव मित्र आहेत. असे समजणे म्हणजे अज्ञान. याउलट जीव आणि शिव यांचे एकत्व मनात ठसणे आणि हे एकत्व प्रत्यक्ष अनुभवणे म्हणजे ज्ञान. गुरूशिवाय अध्यात्म मार्गाची वाटचाल करणे हे अशक्य नसले तरी खडतर नक्कीच आहे. प्राचीन शैव आगम ग्रंथामध्ये गुरू तीन प्रकारचा सांगितला आही. पुरुष गुरू, सिद्ध गुरू आणि दैवी गुरू. पुरुष गुरू हा हाडामांसाच्या देहाद्वारे शिष्याला ज्ञान प्रदान करतो. साधारणत: अशाच प्रकारचा गुरू सहज लाभतो. पुरुष गुरूचेही हा सत्गुरू आणि गुरू असे उपविभाग पडतात. सदगुरू म्हणजे अशी व्यक्ति की जिला पूर्णत्वाने परमेश्वरी चैतन्याची अनुभूती आलेली आहे. गुरू म्हणजे अशी व्यक्ति की जा योगमार्गावर अत्यंत प्रगत तर आहे, तिला परमेश्वरी चैतन्याची कचित प्रसंगी अनुभूती आलेली आहे. पण अजूनही सद्गुरूप्रमाणे तिला पूर्णत्वाने परमेश्वरी चैतन्याची प्राप्ती झालेली नाही. येथे साधकाच्या दृष्टीने लक्षात ठेवायची एक महत्वाची गोष्ट म्हणजे सद्गुरू आणि गुरू यांमध्ये श्रेष्ठ, कनिष्ठ असा भेदभाव कधीही करू नये. कारण साधकापेक्षा या दोन्ही प्रकारच्या व्यक्ति अत्यंत प्रगत असतात. त्यात भेदाभेद करणे हा साधकाच्या दृष्टीने अनाधिकारच ठरतो. त्यामुळेच आध्यात्मिक क्षेत्रात सद्गुरू आणि गुरु या दोघांनाही गुरू याच शब्दाने संबोधले जाते.
आत्मा हाच गुरू आत्मा हाच मालिक